कणकवली विधानसभेतील सर्व 9 उमेदवारी अर्ज वैध

आमदार नितेश राणे, संदेश पारकर यांच्यासह अन्य उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये दाखल झालेल्या 9 उमेदवारी अर्जांच्या छाननी मध्ये सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकी करता भाजपाकडून आमदार नितेश नारायण राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश भास्कर पारकर तर बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत आबाजी जाधव यांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर अपक्ष म्हणून गणेश अरविंद माने, बंदेनवाज हुसेन खानी ,संदेश सुदाम परकर, प्रकाश दत्ताराम नारकर व विश्वनाथ बाबू कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये संदेश पारकर व संदेश परकर या नावांमध्ये साधरम्य असणारे दोन अर्ज दाखल झाले होते. आज छाननी दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून आमदार नितेश राणे, संदेश पारकर या प्रमुख उमेदवारांसहित इतर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह वैभववाडी देवगड तहसीलदार देखील उपस्थित होते. त्यानंतर 4 नोव्हेंबर पर्यंत दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.

error: Content is protected !!