शिवसेना ठाकरे गटाचा कणकवली विधानसभेचा उमेदवार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्वेनुसार देणार

मातोश्री येथील बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या सूचना
कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यासंदर्भात नुकतीच मातोश्रीवर एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत इच्छुक चार पैकी एक उमेदवार सतीश सावंत यांनी आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे उर्वरित तीन मध्ये जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख अतुल रावराणे या तिघांपैकी कोनी एकाला पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. ज्याला उमेदवारी दिली जाईल त्याचे सर्वांनी एकजुटीने काम करायचे असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या उमेदवार निवडीकरिता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांनी केलेल्या सर्वेचा आधार घेणार असून या सर्व्हेच्या आधारे उमेदवार दिला जाईल असेही त्यांनी भर बैठकीमध्ये सर्वांसमोर सांगितले. त्यामुळे या सर्व्हेत कोण बाजी मारतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे