कणकवली महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या २२ व्या विभागीय युवक महोत्सव २०२५ चे आयोजन

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर असे चार जिल्हे समाविष्ट होणार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चा २२वा विभागीय युवक महोत्सव 2 ऑक्टोबर 2024 रोजी कणकवली कॉलेज कणकवली मध्ये होणार आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे विभागीय केंद्र कोल्हापूर अंतर्गत सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापूर असे चार जिल्हे समाविष्ट होणार आहेत व पारंपारिक विद्यापीठाप्रमाणे मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी 22 वा विभागीय युवक महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी कणकवली कॉलेज कणकवली अभ्यास केंद्राकडे सोपविण्यात आले आहे .
या महोत्सवामध्ये संगीत ,नृत्य ,नाट्य ,ललित कला , वाड:मय विभाग अशा 36 कला प्रकारांची स्पर्धा होणार आहे वय वर्षे 25 च्या आतील कोणीही मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी विद्यार्थिनी या युवा महोत्सवामध्ये सहभागी होऊ शकतात.
येथे निवड झालेले विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर केंद्रीय युवक महोत्सव नाशिक येथे सहभागी होऊ शकतात व तिथे निवड झालेला विद्यार्थी विद्यार्थिनी इंद्रधनुष्य या 22 विद्यापीठाच्या महोत्सवात सहभाग नोंदवू शकतात त्यानंतर झोनल व नॅशनल अशी स्पर्धा होते या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतो यासाठी रत्नागिरी सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यातील मुक्त विद्यापीठाचा कोणत्याही अभ्यासक्रमाचा विद्यार्थी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या केंद्रामार्फत कणकवली कॉलेज कणकवली अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केंद्रप्रमुख तथा प्र प्राचार्य युवराज महालिंगे सांस्कृतिक समन्वयक प्रा. एच एम . भिसे संपर्क -८४३२५४७६६७ प्रा. एम .जे .कांबळे संपर्क -९४०४७४७१६१ यांनी केले.
कणकवली प्रतिनिधी