अलौकिक शक्ती असल्याचा दावा ठरला फोल

अभाअनिसला स्वहसाक्षरात लिहून दिले माफीनामापत्र मालवण तालुक्यातील किनारपट्टीवरील एका वर्दळीच्या गावातील एका तरूण ज्योतिषाने हमरस्त्यालगत बोर्ड लाऊन ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला . आपल्या व्यवसायाची भरभराट व्हावी या हेतूने विरेंद्र मोहिते पाटील संचलीत मिस्टरी टॉक चॅनेलला एक अतिरंजक कथा रचवून मुलाखत दिली . ती मुलाखत देताना त्याच गावातील एका नामवंत शाळेच्या नावाचाही त्याने उल्लेख केला होता . या शाळेमध्ये तो स्वतः पाचवी ते बारावीपर्यंत शिकल्याचे ही त्याने सांगितले .त्याच शाळेच्या परिसरात एक विहीर आहे . त्या विहिरीमध्ये 40-50 वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता . त्या शाळेच्या परिसरा सारखी दूसरी हॉरर जागा दुसरी नाही,असा ही दावा त्याने या व्हिडिओत केला होता.
या व्हिडिओत त्याने त्याच गावातील गेली दहा वर्ष मधुमेहाने आजारी असलेल्या एक काकूनां झालेली भुतबाधा आत्मज्ञानाने ओळखून ती बाधा उतरवून तीचा मधुमेह कायमचा बरा केल्याचे छातीठोक दावा त्याने केला होता.
या रंजक कथेची सुरूवात अशी झाली. सदर महिलेची शुगर कमी होत नसल्याने काही बाहेरची पिडा असल्यास पहावी म्हणून पिडीत महिलेचे पती तीला रात्री ९ वा . त्या जोतिषाकडे घेऊन गेले होते.मात्र आपल्यात अतिंद्रिय शक्ती आहे व माझ्यातअंतर्ज्ञानाने भूत, भविष्य, वर्तमान अचूक ओळखण्याची ताकद असल्याने त्या काकूला बाहेरची मोठी पिडा असल्याचे सहज ओळखून हे प्रकरण साधं नसून भयंकर आहे असे सांगून त्या युवा ज्योतिषाने आधी त्या दोघांच्या मनात तीच्या, तिच्या पतीच्या, आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूची भिती निर्माण केली . ती दहा वर्षापूर्वी गरोदर असताना त्या शाळेच्या विहिरीजवळ कपडे धुवायला गेली असताना तेथे जलखूनीने आणि त्या शाळेच्या परिसरात कब्रस्तानामधील(जे मुळातच अस्तित्वात नाही) जिन्नस व खवीस अशा एकूण तीन भुतात्म्यानी तिला पछाडले असल्याचे अंतज्ञानाने आणि प्रश्न कुंडलीच्या आधारे ओळखले असल्याचेही त्याने भासवले. नंतर त्याने ही तिनही भुते त्या काकूच्या अंगात हजर केल्याचा दावा करून त्यानी ‘अरे! तू आमचे काय वाकडे करणार आहेस? आम्ही हिला घेऊन जाणार , हिच्या नवऱ्याला घेऊन जाणार, तिच्या दोन्ही मुलांना घेऊन जाणार’ अशा प्रकारचा संवाद त्यांच्याशी केला असे सांगून संबंधित काकांच्या व काकूंच्या मनात मृत्यूची भिती निर्माण केली . त्याचवेळी ते तिन्ही आत्मे उतरवण्यासाठी तिला हाय शुगरचा त्रास असल्याने त्यावर उपाय म्हणून विभूती प्यायला दिली . पुढील चार महिन्यांमध्ये त्यांनी त्या काकूंच्या अंगातील तीनही भूते म्हणजेच अतृप्त आत्मे उतरवल्याचा आणि आता त्या काकू दोन किलोमीटर बाजाराला चालत जातात असाही त्याने दावा केला .
याच व्हिडिओमध्ये पुढे त्याने दुसऱ्या अशाच एका प्रसंगात एका विवाहित स्त्रीला मूलबाळ होत नसल्याने त्याचे नातेवाईक आपल्या कडे घेऊन आले . आपल्या अंतर्ज्ञानानेच ,अलौकिकशक्तीने आणि प्रश्न कुंडलीच्या आधारे आणि राहू , केतू ,शनि , मंगळ यांच्या ग्रहाच्या स्थितीच्या आधारे तिला तिच्या गावाजवळील एका पाणवठ्यावर बुडून मृत्यू झालेल्या एका १५ वर्षीय मुलीच्या आत्म्याने पछाडल्याचे सांगितले व तिच्याही अंगातील ते भूत उतरविल्याचा दावा त्याने केला. ते हि भूत तिच्या अंगात आणले .त्याही भूताने ‘अरे पोरा! तू माझे काय वाकडे करणार ? हि एका गुरुजींकडे चौकशीला गेली असता त्या गुरुजीनाही मी ठार मारले आहे. आता मी तुलाही ठार मारणार आणि हिलाही ठार मारणार’ .असे भुताने सांगितल्याचे सांगून त्या कुटुंबीयांमध्येही भिती निर्माण केली . तसेच तिच्यावर , तिच्या नवऱ्यावर आणि वडिलांवर सातारा , कोल्हापूर, पाटणा येथून मुसलमानी करणी असून त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगितले . हे सर्व त्याने आपल्यात अतिद्रियशक्ती असल्याचा दावा करून मी अंतर्ज्ञानाने तसेच राहू, केतू, मंगळ, शनी या ग्रहांच्या स्थितीवरून आणि दैवी कृपेने सहज मी सगळे ओळखू शकतो असाही दावा करून नारायण नागबळी सारखा विधीही करण्यास सांगितले व त्या नंतर विवाहितेवरील करणी काढली . तसेच तिच्यावरील भूतही त्यांनी उतरवले .
अभाअनिसकडे हा व्हिडिओ प्राप्त झाल्या नंतर संबधीत शाळेशी संपर्क केला असता शाळा अस्तित्वात आल्या पासून मागील १०० वर्षात कोणालाही कसलीही बाधा आजपर्यंत झाली नसून शालेय परिसरात कोणतेही कब्रस्तान नसल्याचे सांगण्यात आले . महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा 2013 मधील अनुसूची पाच मध्ये आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती आहे ,म्हणजेच मला अंतर्ज्ञान आहे , अलौकीक शक्ती आहे असं भासवून एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा तसे सांगणे व न ऐकल्यास वाईट परिणाम होतील असे भासवून इतरांना धमकी देणे , फसविणे, ठकविणे या अनुसूचीचा त्याने भंग केला आहे . त्याच प्रमाणे ड्रग्ज अँन्ड मॅजिक रेमिडिज ॲन्ट १९५४ अंतर्गत आजारावर औषधोपचार न करता उपचार म्हणून अगरबत्तीची राख तिर्थ म्हणून प्यायला देणे हा दंडनीय अपराध आहे. तसेच जादुटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अनुसुची आठ नुसार एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भुताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देऊन तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्या ऐवजी तिला ,अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्ती करणे हा ही दंडनीय अपराध आहे. त्यामुळे कलम दोन ख व घ नुसार त्या युवा ज्योतिषावर गुन्हा दाखला व्हावा या साठी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सदर गावातील पोलीस निरीक्षक तथा दक्षता अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता . संबंधित काका काकूंच नाव व सदरचा व्हिडिओ ही संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाना देण्यात आला होता . संबंधीत शाळेचे संस्थाचालक व पोलिस यांनी त्या युवा ज्योतिषाला त्याने केलेल्या गुन्हाची कल्पना देताच त्याने व्हिडिओ मधील गावाचा व शाळेच्या नावाचा उल्लेख काढून टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला .
अभाअनिसने दाखल केलेल्या तकार अर्जानुसार शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदाचे गांभिर्य लक्षात घेऊन सदरच्या व्यक्तीला पोलिस ठाणे येथे बोलावून घेण्यात आले. तसेच पिडित काकूंच्या नवऱ्यालाही बोलावून घेण्यात आले . त्यांनीही आपल्या पत्नीला जलखूनीने, खव्वीस आणि जिन्नसने पछाडले असल्याचे सदरच्या युवा ज्योतिषाने सांगितल्याचे मान्य केले .
जादूटोणा विरोधी कायदाच्या अनुसूचींचा भंग केल्याचे लक्षात येतात आणि त्य कायद्यात नमुद शिक्षेचे गांभिर्य लक्षात येताच सदरच्या युवा ज्योतिषाने ‘स्वतःकडे कोणतेही अंतर्ज्ञान म्हणजेच अलौकिक शक्ती नाही,शाळेच्या परिसरात कोणताही जलखूनी अथवा जिनस, खव्वीस नाही . माझा व्यवसाय चालावा या आसुरी हेतूने माझ्यात अलौकिक शक्ती असल्याचा व कोणतीही समस्या अंतर्ज्ञानाने ओळखून त्यावर उपायही करून पिडितास सुखसमाधान मिळवून देऊ शकत असल्याचा खोटा दावा चॅनेलवर केल्यासचे मान्य केले . अशा पिडित समस्याग्रस्त लोकांचा ओघ आपल्याकडे वाढेल व आपल्या ज्योतिष धंद्यात बरकत येईल’ या हेतूने तो व्हिडीओ बनविल्याचा लेखी कबुली जबाब सर्वांसमक्ष स्वहस्ताक्षरात दिला.यापुढे ‘कोणालाही भूत लागले आहे,तुझ्यावर करणी केली आहे , तुला आसूरी शक्तीने, आत्म्याने झपाटले . असा दावा करणार नाही व जादूटोणा विरोधी कायदातील कोणत्याही अनुसूचीचे उल्लखन करणार नाही’ असे अभाअंनिसमितीचे अध्यक्ष ॲड . राजीव बिले , जिल्हा सरचिटणीस अजित कानशिडे , जिल्हा संघटक विजय चौकेकर व सामाजिक कार्यकर्ते व अभाअंनिसचे सदस्य नितीन वाळके आणि संबंधित ठाणेचे सहाय्यक पोलिक निरीक्षक यांच्या समोर स्वहस्ताक्षरात माफीनामा लिहून दिला . संबंधिताचे वय लक्षात घेता अभाअनिस सदस्यांनी सामजस्याची भूमिका घेऊन एक वेळ त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला तसे पोलिसांना लिहूनही दिले . मात्र यापुढे अशी चूक त्याच्याकडून झाल्यास जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल अशी समजही त्याला दिली. राज्य उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर आणि महाराष्ट्र संघटक हरीभाऊ पाथोडे यांनी हि केस कशी हाताळावी याचे यशस्वी मार्गदर्शन केले . समाजात असे कोणी फसवित असेल तर आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर आणि अध्यक्ष अँड. राजीवजी बिले यांनी केले आहे .

error: Content is protected !!