एलआयसीचा ६८ वा वर्धापन दिन मालवण शाखेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा

प्रमुख उपस्थिती मालवण तहसीलदार मा.श्रीमती वर्षा झालटे

1 सप्टेंबर ते सात सप्टेंबर हा विमा सप्ताह म्हणून दरवर्षी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो या निमित्ताने संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं एलआयसीच्या मालवण शाखेमध्ये ६८ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने विमा सप्ताहाचे आयोजन केले होते याचे उद्घाटन मालवणच्या तहसीलदार मा.श्रीमती वर्षा झालटे यांच्या हस्ते दीपप्रजवलनांने करण्यात आले. यावेळी एलआयसी मालवण शाखेच्या शाखाधिकारी मा.श्रीमती सतेजा बोलवलेकर यांनी एलआयसी बद्दल थोडी माहिती दिली.तसेच या कार्यक्रमाला एलआयसी अधिकारी श्री. किरण पालव, श्री. हरी कांबळी,श्री मंगेश अधांगळे व श्री कमलाकांत परब आणि इतर कर्मचारी वर्ग,विमा प्रतिनिधी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास अधिकारी शैलेश पावसकर यांनी केले

error: Content is protected !!