तालूकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायनस्पर्धेत “विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल, कणकवली उत्तेजनार्थ

प्रशालेच्या यशा बद्दल सर्वच स्तरातून होतेय कौतुक

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी गुरुवर्य पुरस्कृत तालूकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायनस्पर्धेत “विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल, कणकवली. या प्रशालेला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या समूहगान स्पर्धेत विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल कणकवली या प्रशालेला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
या समूहगान स्पर्धेसाठी सौ. प्रज्ञा राणे, श्री. प्रथमेश गांवकर तसेच इतर सर्व शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.
या समूहगान स्पर्धेतील
विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. श्री. पी. जे. कांबळे सर, जेष्ठ शिक्षक श्री. अच्युतराव वणवे सर , पर्यवेक्षिका सौ. वृषाली जाधव तसेच विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. दिव्या सावंत तसेच पर्यवेक्षिका सौ. श्रुती बावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या यशाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन सौ. राजश्री साळुंखे, सेक्रेटरी वळंजू, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. तवटे यांनी केले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!