पोलीस हवालदार रविंद्र बाईत यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

रवींद्र बाईत यांची समाजाभिमुख अधिकारी म्हणून आहे ओळख

कणकवली पोलीस ठाण्यामध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेले रविंद्र सदाशिव बाईत यांची पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२४ रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे.
रविंद्र बाईत यांनी पोलीस दलात गेली ३२ वर्ष यशस्वीपणे सेवा बजावली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी त्यांना बढती मिळाल्याबद्दल कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकारी, मित्र परिवार यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!