शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाबूराव धुरी
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील तीन तालुक्यांसह कुडाळ तालुक्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या ते उपजिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांनी दोडामार्ग तालुकाप्रमुख म्हणूनही चांगले काम केले होते.अन्य पदाधिकारी असे : सहसंपर्कप्रमुख – संजय पडते (सार्वतवाडी विधानसभा आणि कुडाळ तालुका), संपर्कप्रमुख – कालिदास कांदळगावकर (सावंतवाडी विधानसभा), विधानसभाप्रमुख – रूपेश राऊळ (सावंतवाडी विधानसभा), विधानसभा संघटक – सुकन्या नरसुळे (सावंतवाडी विधानसभा).
ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रतिनिधी l दोडामार्ग