“विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी आयडियल इंग्लिश स्कूल सज्ज”

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत उद्या साकारणार ए पी जे डॉ अब्दुल कलाम यांचा भव्य मानवी मनोरा.
१००० हुन अधिक विद्यार्थी-पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर होणार सहभागी.
जिल्ह्यातील वाद्यवृंद आणि विविध कलाकारांच्या उपस्थित पाहायला मिळणार नेत्रदीपक नजराणा.
कणकवली : आयडियल इंग्लिश स्कूल,सोमस्थ अकॅडमी आणि सिंधु-गर्जना ढोलपथक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत उद्या दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन आयडीयल इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले असून कार्यक्रमाची तयारी आता पूर्ण झाली आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयडीयल इंग्लिश स्कूल च्या भव्य पटांगणावर ए पी जे डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिकृतीचा भव्य मानवी मनोरा करण्यात येणार आहे. यावेळी सुमारे एक हजार हुन अधिक विविध वाद्ये एकाच वेली तालासुरात वाजवली जाणार आहेत. यामध्ये ढोल, ताशा, तबला, पेटी, ढोलक, मृदूंग, टाळ, हलगी, दिमडी, चकी इत्यादी वाद्यांचा समावेश आहे. यामध्ये पालक, विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील सर्व विविध क्षेत्रातील कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम विश्विक्रमी असून याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाची आयडियाला इंग्लिश स्कूल वरवडे येथे जय्यत तयारी सुरु असून आता आयडीयल कॉलेज हे या कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहे अशी माहिती आयडीयल इंग्लिश स्कूल ने दिली आहे.
कणकवली / कोकण नाऊ / मयुर ठाकूर