तुमच्या बुद्धीला पटेल तेच करा, अंधश्रद्धाळू बनू नका – विजय चौकेकर

विद्यार्थांनो आपण आज शाळेत विज्ञान विषय शिकतो . त्याचे तत्वज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन आहे . शाळेत जे मूल्यशिक्षण शिकविले जाते त्यामध्ये ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केला गेला आहे . शासनाने शिक्षणाच्या गाभाभूत घटकामध्ये ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केला आहे . याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जीवनात क्षणोक्षणी वापर करा आणि तुमच्या बुद्धीला , तर्काला जे पटेल तेच करा पण अंधश्रद्धाळू बनू नका .
असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

जि प . पूर्ण प्राथ शाळा मसुरे देऊळवाड ता . मालवण येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .

 यावेळी त्यांच्यासमवेत विचार मंचावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद कबरे सर , प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रशांत पारकर सर , गुरुनाथ ताम्हणकर सर , तेजल ताम्हणकर मॅडम , कविता साबळे मॅडम ,  आदी उपस्थित होते .


     विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची विद्यार्थ्यांना , शिक्षकांना  आणि पालकांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती दिली . हा कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते .  असे सांगितले . यावेळी सिताराम लाकम , गोविंद भोगले , उन्नती मेस्त्री , विशाखा सावंत आदी पालक उपस्थित होते 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजल ताम्हणकर मॅडमनी केले तर आभार गुरुनाथ ताम्हणकर सरांनी मांडले .

error: Content is protected !!