उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल!

आमदार नितेश राणे यांचा विश्वास

खासदार विनायक राऊत यांचे रिटर्न तिकीट काढून ठेवलेले

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढविण्या बाबत चर्चा होत आहे.महायुतीचे नेते त्यावर निर्णय घेत आहेत.उशीर होत असला तरी शेवटच्या ४८ तासात उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असताना जरी उमेदवार जाहीर झाला.तरी महायुतीचा च उमेदवार निवडून येईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.विनायक राऊत यांची रिटर्न तिकीट कडूनच ठेवलेली आहे अशी टीका केली.मोदींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे.त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतःचे थोबाड बंद केलं नाही. तर मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल.स्वार्थाच दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे.अशीही टीका यावेळी केली.
राऊत आणि त्याच्या मालकाला औरंगजेब च्या बाजूला दोन कबर खोदून घेण्याची घाई लागलेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका करतील तेवढे ते त्या कबरी च्या खड्ड्यात जातील. एकीकडे मालकाच्या मुलाला वाचविण्यासाठी मालक आणि त्याच्या मालकाची बायको दिल्ली वाऱ्या करत आहेत.
आणि एकीकडे पाळलेल्या कुत्र्याच्या माध्यमातून भुंकायला लावून टीका करतात.राऊत ने त्याच थोबाड बंद केलं नाही. तर मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल. मग रोज औरंगजेब आठवेल असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
मोदींची औरंगजेब सोबत तुलना करन म्हणजे देशभरातील नागरिकांचा अपमान करणे आहे
जी धार्मिक स्थळ काँग्रेसच्या काळात अंधारात होती. त्यांना उजेडात आणण्याच काम मोदी साहेबांनी केलय.
सुपारिबाज राऊत ला भाजपा सोबत उद्धव ठाकरेंनी युती करू नये. म्हणून काँग्रेस ने सुपारी दिली आहे.
राज ठाकरेंना युती मध्ये यायचं असेल तर सकारात्मक काही गोष्टींना आकार देणे गरजेचे आहे.त्यासाठी ही बैठक आहे. स्वागतार्ह आहे.
खिचडी चोराणे व्यवसायबद्धल बोलू नये. Ed आणि cbi चा खेळ काँग्रेस ने सुरू केलेला होता हे आधी संजय राऊत ने जाणून घ्यावे.
हिंदुत्वाचा विचार सर्वांना घेऊन भक्कम होत असेल तर राज ठाकरेंना आम्ही घेतलं तर मिरच्या का लागल्या. तुम्ही वंचित ला घेता ते चालत.सांगली ची जागा काँग्रेस ने जाहीर करून उद्धव ठाकरेला फाट्यावर मारले आहे. त्याची काय लायकी आहे. हे ही यादी बघून समजत आहे.असे एक प्रश्नावर बोलताना ते म्हणाले.महायुतीला एकत्र ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत. ते असे पर्यँत सर्व काही आलबेल आहे.
राहुल गांधीना किती वेळा लॉन्च करायचं ते आपल्या पायावर उभे राहणार नाहीत. त्यांची मशीन बंद पडली आहे.अशी टीका प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केली तरी खरीच आहे.
नवीन मतदार हे भारताची खरी ओळख आहेत. 10 वर्षात झालेले बदल पाहून त्यांनी मतदानासाठी भाग घ्यावा. मोदींना पंतप्रधान म्हणून निवडून देण्यासाठी हा नाव मतदार पूर्णतः मतदान करेल असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!