कणकवली तालुक्यात 4 तलाठ्यांना रिक्त जागी नियुक्त्या

हुंबरट, तरंदळे व हुंबरणे तलाठी झाले रुजू

उर्वरित नियुक्त्या आचारसंहितेनंतर देणार

कणकवली तालुक्यातील रिक्त असलेल्या चार तलाठी कार्यालयांमध्ये नवीन भरती प्रक्रियेत निवड झालेल्या तलाठ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये चार पैकी तीन तलाठी हजर झाले असून त्यात हुंबरट तलाठी म्हणून किशोर चौगुले, हूंबरणे तलाठी तन्मय चिकणे, तरंदळे तलाठी भगवान मानवर हे हजर झाले आहेत. तर बिडवाडी तलाठी म्हणून नयन चौगुले यांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या आदेशाने या नियुक्त्या झाल्या असून भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 4 खुल्या प्रवर्गामधील तलाठ्याना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र उर्वरित नियुक्ती देण्यापूर्वीच आचारसंहिता जाहीर झाल्याने उर्वरित नियुक्त्या आचारसंहितेनंतर दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!