सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट-एक सेवा अशीही

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र ची सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट

३० शाळांना पटसंख्येनुसार ६० लॅपटॉपचे वाटप करत संस्थेचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट यशस्वी संपन्न

डिजिटल सहकार्य | लॅपटॉप वाटप | दुर्गवीर प्रतिष्ठान

रामगड (तालुका मालवण)- दुर्गवीर. प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आजगायत गडसंवर्धन कार्य सातत्याने सुरू आहे,यासोबतच गडघेऱ्यातील गावे, शाळा यातील महत्वाच्या गरजा ओळखून त्या देण्यासाठी ही. दुर्ग प्रतिष्ठान प्रयत्न करीत आहे.याचाच एक भाग म्हणून दूर्गविर संस्थेच्या CSR उपक्रमाअंतर्गत व मॉर्निग स्टार या कंपनीच्या सहकार्याने अनेक जिल्ह्यातील गडघेऱ्यातील शाळांमध्ये लॅपटॉप वाटप टप्याटप्याने सुरू केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॅपटॅाप मागणी केलेल्या ३० शाळांना त्यांच्या पट संख्येनुसार ६० लॅपटॅाप चे वितरन नुकतेच मालवण तालुक्यातील प्रगत विद्यामंदिर रामगड येथे करण्यात आले. यामध्ये सावंतवाडी मधील मांडखोल धवडकी, वेंगुर्ला तालुक्यातील पेंढ-याची वाडी, केरवाडा शिरोडा, कणकवली तालुक्यातील वरवडे मधील २ शाळा, मालवण तालुक्यातील तोंडवली, वेरली, रामगड मधील २ शाळा, आनंदव्हाळ, आडवली मधील २ शाळा, आंबेरी मधील २ शाळा, किर्लोस, मालवण शहर मधील २ शाळा , श्रावण, आचरा, दांडी, शिरवंडे, वायरी भूतनाथ, देवबाग मधील २, आंबवणे, वायरी बांध,त्रिंबक, मांडखोल या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांचा समावेश होता.
दुर्गवीर प्रमुख . संतोष हासुरकर यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याची माहिती देत दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत गडकिल्ले संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना मोठ्या संख्येने लॅपटॉप करण्यामागचा हेतू हाच आहे की ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक साहित्य उपलब्ध व्हावे जेणेकरून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल आणि भावी पिढी डिजिटली साक्षर होण्यास मदत होईल, असे मत श्री. हासुरकर यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षकांच्या वतीने दुर्गवीरप्रमुख श्री. संतोष हासुरकर यांच्या सह इतर दुर्गवीरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर रामगड सरपंच श्री. शुभम मठकर,दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. संतोष हासुरकर, श्री.अभय प्रभुदेसाई, रामगड हायस्कूल चे मुख्याध्यापक अंकुश वळंजू सर, रामगड शाळा संस्था उपाध्यक्ष श्री.सुभाष तळवडेकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे सर, वरिष्ठ पत्रकारश्री.विजय शेट्टी, दुर्गवीर सचिव श्री.सागर टक्के, खजिनदार श्री. सुरेश उंदरे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. अर्जुन दळवी,रत्नागिरी जिल्हा समन्वयक, उपखजिनदार श्री. प्रशांत डिंगणकर, दुर्गवीर सदस्य श्री. महेश सावंत, प्रमोद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान च्या सिंधुदुर्ग विभागातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
दुर्गवीरच्या गडसंवर्धन कार्यासोबत अश्या शैक्षणिक उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. तसेच आपण आपल्या ओळखीच्या कंपनीचा CSR मिळवून देऊ शकता व आम्ही नक्कीच गडघेऱ्यातील असे अनेक उपक्रम यशस्वी पार पाडू.
संस्थेस आपण दिलेली देणगी 80 G आयकर नियमांतर्गत करसवलत पात्र आहे.
यासाठी
संपर्क क्रमांक : ९९३०३३७६५३ येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले

error: Content is protected !!