समाज संघटीत झाला तर विकासाचा राजमार्ग दिसतो जिल्हा अध्यक्ष मा. सी. आर . चव्हाण

दिनांक – १० / ०३ / २४ रोजी भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , शाखा – देवगड च्या संयुक्त विद्यमाने संतशिरोमणी रविदास महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ . शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मु . मालपे ,ता . देवगड येथे देवगड तालुका सल्लागार मा. श्री . वसंत लक्ष्मण समजिसकर व मा. सौ. वर्षा वसंत समजिसकर (महिला आघाडी उपाध्यक्षा देवगड ) यांचे घरी समाज बांधव व संघटना पदाधिकारी यांचे उपस्थितीत साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष मा. सी. आर . चव्हाण , जिल्हा सरचिटणीस मा. संतोष जाधव . मा . श्री. अनिल मारूती चव्हाण . (राज्य कार्याध्यक्ष ), तथा अंधश्रद्धा निर्मुलन समिती सदस्य तसेच मा. श्री. यशवंत देवरूखकर (जिल्हा उपाध्यक्ष ) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन देवगड तालुका अध्यक्ष मा, सुरेशजी जाधव साहेब , सरचिटणीस मा. बबन देवरूखकर , मा. सौ. कल्पना प्रकाश चव्हाण . (महिला आघाडी प्रमुख ) व तालुक्यातील सर्व गावांचे समाज बांधव प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. अनिल चव्हाण राज्य कार्याध्यक्ष यांनी समाजाला उद्बोधन पर मार्गदर्शन करताना – समाजात ज्या अंधश्रद्धा , वाईट रुढी परंपरा या बाबत आपल्या समाजाने शिक्षणाबरोबर विज्ञानाची कास धरून सत्य – असत्याची पडताळणी करून समाज सुदृढ होण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले . त्याजबरोबर त्यांनी समाजात अंधश्रद्धा , भानामती , बुवाबाजी ‘ करणी वगैरे करून कसे फसविले जाते . याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
समाज एकसंघ झाला तरच खऱ्या अर्थाने महामानव डॉ . बाबासाहेबांच्या संविधानाचा जीवनात उपयोग झाला व खऱ्या अर्थाने ते आपण अंगिकारले असे म्हणता येईल . यासाठी पायाभूत हक्क व अधिकार मिळवून आपल्या समाजाचा बौद्धीक , सामाजिक विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही .
आपण आपल्यातील किरकोळ मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने राहणे ही काळाची गरज आहे.
भविष्यात आरक्षणच संपुष्टात येईल.
स्पर्धेच्या युगात टिकाव धरायचा असेल तर आपली मुले उच्चशिक्षित झालीच पाहीजेत . असे प्रतिपादन श्री. संतोष जाधव यांनी केले.
संपूर्ण देवगड तालुक्यातील समाजबांधव जर एकत्र यायचे असतील तर त्यांना हक्काचे व्यासपीठ असायलाच हवे . यासाठी समाजभवनाची गरज असून संघटनेने यासाठी पाठपुरावा करून हे एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असा आशावाद मा. देवरूखकर गुरुजी यांनी व्यक्त केला.
या उत्कृष्ट व नियोजनबद्द कार्यक्रमासाठी देवगड अध्यक्ष मा. सुरेशजी पवार साहेब व सरचिटणीस मा. बबन देवरूखकर सर ,मा. यशवंत देवरूखकर गुरुजी तसेच मा . वसंत देवरूखकर , सौ. वर्षा देवरुखकर , सौ. कल्पना चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी राज्य अध्यक्ष मा. पंढरी चव्हाण साहेब यांनी फोन द्वारे शुभेच्छा संदेश दिला
मा.श्री . प्रशांत धामापूरकर , श्री. भास्कर कोतावडेकर , श्री. गणेश समजिसकर , श्री. वामन शिरकर , श्री. रमेश शिरकर व श्री. अनिसकुमार चव्हाण . ( जिल्हा युवक सचिव ) व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते .
सूत्रसंचालन मा. सुरेशजी जाधव साहेब अध्यक्ष देवगड व सचिव श्री. बबन देवरूखकर यांनी आभार व्यक्त करून
सहभोजनाने कार्यक्रमाची गोड सांगता झाली.