अभाअनिस आणि जादूटोणा विरोधी कायदा देवधर्माविरुद्ध आहे हा गैरसमज प्रथम दूर करूया – अँड.राजीवजी बिले

महाराष्ट्र शासनाने 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा संमत केला . हा कायदा सर्व सामान्य जनतेला समजून सांगण्यासाठी अभाअंनिसमिती गावागावात व्याख्यानाच्या माध्यमातून पोचत आहे . मात्र अभाअंनिमूर्लन समिती देवधर्माला बुडवायला निघालीय हा लोकांचा झालेला गैरसमज आणि जादूटोणा विरोधी कायदा देवधर्माविरुद्ध आहे हा झालेला गैरसमज प्रात्यक्षिक व व्याख्यानाच्या माध्यमातून जनतेला समजून सांगूया आणि जनतेचा गैरसमज दूर करूया . तसेच हा कायदा देवधर्माविरुद्ध नसून देवाधर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध आहे हे तळागाळातील लोकांपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून सर्वानी पोहोचविण्याचा प्रयत्न करूया . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अँड. राजीवजी बिले यांनी केले .
कुडाळ कॉलेज कुडाळ येथे नुकतीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सुजाण नागरिकांसाठी जादूटोणा विरोधी कायदा समजून देण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अँड राजीवजी बिले यांचे अध्यक्षते खाली सभा आयोजित केली होती . या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते .
यावेळी त्यांच्या समवेत विचारमंचावर जिल्हा संघटक विजय चौकेकर , जिल्हा उपाध्यक्ष डॉ . संजिव लिंगवत, जिल्हा सरचिटणीस अजित कानशिडे, जिल्हा सदस्य नामदेव मठकर, कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ . श्रीकांत सावंतसर , अँड अमित सावंत , अँड गौरी आपटे आदी मान्यवर उपस्थित होते . या वेळी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सर्वांना शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्यातील बारा कलमांची सविस्तर माहिती देऊन कायद्याची पत्रके वाटप केली . तसेच हा कायदा देव आणि धर्म या विरोधी नसल्याचे सांगितले . या कायद्यामध्ये कोठेही देव , धर्म , धार्मिकता , उपासना , परंपरा हे शब्द नसून कोणत्याही धर्मातील भक्तीला, उपासणेला , प्रार्थनेला , पूजेला,अथवा विधीला या कायद्याने अटकाव नाही व कोणावरही यासाठी कायदयाने गुन्हा दाखल होऊ शकत नाही . एवढेच नव्हे तर मंदिर, दर्गे ,चर्च अथवा घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी भूत उतरविण्यासाठी कोणी मंत्र म्हणत असेल, प्रार्थना करीत असेल, भजन करीत असेल, अथवा पूजा, उपासना इत्यादी विधी करीत असेल तरीही कायद्याने गुन्हा होत नाही. त्यामुळे हा कायदा सर्वांनी समजून घ्यावा असे सांगितले . डाँ . संजीव लिंगवत यांनी माणसांच्या मनाच्या विविध आजारांची सिझोफेनिया , मॅनिया , हिस्टेरिया , पॅरोनिया या आजारांची लक्षणे व आपण त्याला भूत लागले असे समजून नंतर मांत्रिकाकडे उपचारासाठी नेतो व मांत्रिक कशी फसवणूक करतो हे सांगून अशा श्रद्धेच्या नावाखाली जादूटोणा करणारे भोंदू लोकांपासून सावध व्हावे असे आवाहन केले . तर जिल्हा सरचिटणीस अजित कानशिडे यानी हा कायदा शाळा, कॉलेज, गावामध्ये व्याख्यानाच्या आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पोहोचवूया व त्यासाठी आपण सर्वांनी आपआपल्या परिसरात जादूटोणा विरोधी कायदाचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित करण्यासाठी सहकार्य करा असे सांगितले .यावेळी संदिप धामापूरकर , तुषार खानोलकर सर , राजन बोभाटे , रविंद्र परब , बाबाजी राणे आदी सजग नागरीक उपस्थित होते .
कुडाळ ( वार्ताहर )