नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आचरा येथील मसल क्रिएशन फिटनेसचे दैदिप्यमान यश

स्पर्धेत सहभागी पाचही महिलांनी मिळविली सुवर्ण पदके
आचरा–अर्जुन बापर्डेकर गुजरात सुरत येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग फेडरेशन अंतर्गत त्रिनेत्र मित्रमंडळ संचलित
आचरा येथील मसल क्रिएशन फिटनेसच्या महिला खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन
करत पाच सुवर्णपदक प्राप्त केली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. गुजरात येथे नुकत्याच झालेल्या इंडियन पाॅवर लिफ्टिंग फेडरेशनने भरवलेल्या नॅशनल स्पर्धेत ज्यूनिअर गटात आचरेच्या तेजल महादेव बागडे , मास्टर गटात मनीषा आश्रीत ,प्रज्ञा पेडणेकर ,आशा हजारे,चेतना चव्हाण या महिलांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे तर राहुल पुजारी जुनियर गटात सहभाग नोंदवून नॅशनल स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे . त्यांना मसल क्रिएशन फिटनेसचे मनीष चंद्रकांत चव्हाण यांचे मार्गदर्शन लागलं त्यांच्या या यशाबद्दल त्रिनेत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश सरजोशी, व्यावसायिक अशेस पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे.