भालचंद्र महाराज पायी दिंडी च्या वतीने दिविजा वृद्धाश्रमाला साहित्य भेट

या मंडळाच्या वतीने जपली जाते सामाजिक बांधिलकी
प.पू.भालचंद्र महाराज पायी दिंडी सिंधुदुर्ग च्या वतीने स्वस्तिक फाउंडेशन , दिविजा वृद्धाश्रम ला भेट देऊन त्यांना कडधान्य व जीवनावश्यक शिधा देण्यात आला. प.पू. भालचंद्र महाराज पायी दिंडी सिंधुदुर्ग हे मंडळ हे नेहमी भक्ती मार्गाच्या प्रसारा सोबत समाज कार्यातही मोठा वाटा उचलतात. विविध समाज उपयोगी कामे करत असतात. या प्रसंगी मंडळाचे सहसचिव श्री लाड गुरुजी व संचालक श्री हर्षल अंधारी व गजानन देसाई हे उपस्थित होते. व त्या प्रांसंगी सगळे श्रेय मंडळाचे व सर्व वारकऱ्यांचे आहे असे उदगार त्यांनी काढले.
कणकवली प्रतिनिधी