केंद्र शाळा आचरे येथे विज्ञान दिवस साजरा

आचरा–अर्जुन बापर्डेकर आधुनिक भारतातील वैज्ञानिक क्रांतीचा पाया रचणारे शास्त्रज्ञ, आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना ओळखले जाते.असे शास्त्रज्ञ डाॅ.सी.व्ही.रामण यांचा जन्म दिवस २८ फेब्रुवारी हा दिवस जगभर राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.कै. बा. ना. बिडये विद्यालय, केंद्रशाळा आचरे नंबर १ ता. मालवण जि. सिंधुदुर्ग या शाळेमध्ये आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परूळेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.यावेळी उपाध्यक्षा श्रीम. अर्पिता घाडी,सौ परुळेकर सर्व सदस्य,माता पालक उपाध्यक्षा श्रीम.शम्मा शेख, सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ सर्व सदस्य,आचरे केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम. सुगंदा गुरव, नवनाथ भोळे ,शाळेचे मुख्याध्यापक माने सर्व पालकवर्ग ,शिक्षकवृंद व शाळेतील सर्व विद्यार्थी..सूत्रसंचालन श्रीमती पालकर मॅडम यांनी केले. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जगातील व देशभरातील विविध नामवंत, प्रसिद्ध शास्त्रज्ञांची माहिती व त्यांनी लावलेले विविध शोध यांची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सादर केली .कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आचरे केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती गुरव मॅडम यांनी विज्ञान दिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती मीरा बांगर यांनी विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विज्ञान दिनानिमित्त शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे जवळपास 23 प्रयोगाचे सादर करुन विज्ञान दिवस सार्थ ठरविला.

error: Content is protected !!