श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण

कुडाळ श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज.यांच्या कृपाशीर्वादाने तसेच नाणीजधाम पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने आज कुडाळ तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला त्यावेळी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील श्रीं विष्णू धुरी,नानिजधाम पीठ सहाय्यक प्रमुख श्रीं दीपक खरुडे जिल्हाध्यक्ष श्रीं दिनेश मुंबरकर,तालूका अध्यात्मिक प्रमुख श्रीं.जगन्नाथ पाटकर,श्रीं प्रकाश टेमकर व इतर भक्तगण उपस्थित होते तसेच श्री.बुवा दत्ता पाटील यांनी रुग्णवाहीके साठी जागा उपलब्ध करून दिली त्यांचे कुडाळ तालुक्याच्या वतीने व कुडाळ तालुका सेवा समिती च्या वतीने आभार मानण्यात आले