कायदा धुडकावून ठाण्यात सुरू आहे जादूटोना व अघोरी उपचार – अभा अनिस ठाणे शाखेने नोंदविली पोलीस तक्रार

ठाणे – ठाण्यातील सावरकर नगर येथे अघोरी पद्धतीने भूत बाधा उतरविणार्या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याबाबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थानिक शाखा ठाणे, यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार सौ सायली संतोष भोसले कार्यालय वास्तु ओंकार विसावा सोसायटी प्लॉट नंबर ७५, सी- ३, म्हाडा वसाहत, सावरकर नगर ठाणे, वरील पत्त्यावर कार्यालय चालवत असून यांच्यासंदर्भात समितीकडे माहिती व विडिओ प्राप्त झाले आहेत. सदरील महिला तिच्या कार्यालयात जादूटोणा, अघोरी विद्या, भूत, करणी, मूठ असे प्रकार करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
चमत्कारांचा दावा करून आर्थिक प्राप्ती करणे, प्रचार प्रसार करुन लोकांना फसविणे.अंगात अतिंद्रीय शक्ती संचारली असल्याचे भासवून इतरांच्या मनात भिती निर्माण करणे. जादूटोणाविरोधी कायदा 2013 (महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013) नुसार गून्हा आहे. तसेच चमत्कारिक पद्धतीने रोग मुक्तीचा दावा करणे ड्रग्स अँन्ड मॅजिक रेमिडीज अक्ट 1954 नुसार गून्हा आहे.
तरी पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.