प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहण्याची शपथ घेऊया – विजय चौकेकर

ओरोस – थोर भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही . रामन यांनी २८ फेबुवारीला रामन इफेक्टचा शोध लावला . हा दिवस भारतभर राष्ट्रिय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . विज्ञानाने स्वप्नवत वाटणारे अनेक शोध लावले . दूरदर्शन , मोबाईल , संगणक , विमान एवढेच नव्हेतर रिमोटद्वारे चंद्रावर , मंगळावर उतरणार्या यानांवर पृथीवरून नियंत्रयणही ठेवता येऊ लागले . चमत्कार वाटतील असे अनेक शोध विज्ञानाने लावले . त्यामुळे आपण आपल्या आजुबाजुला घडणारी प्रत्येक घटना मग ती भानामती करणे , करणी करणे किंवा जादूटोणा करणाऱ्या भोंदू लोकांकडून केले जाणारे हातचलाखी व रासायनिक संयुगाद्वारे केलेले चमत्कार असो हे विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहाण्याची विज्ञान दिनानिमित्त शपथ घेऊया . आणि का ? कसे? कोणी ? कधी ? केव्हा ? कशाला ? असे प्रश्न प्रश्न विचारून वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .
जिल्हा परिषद पूर्ण प्राथ शाळा ओरोस बुद्रुक नं १ ता. कुडाळ येथे राष्ट्रिय विज्ञान दिना निमित्त महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यान मालेत ते बोलत होते . यावेळी त्यांच्या समवेत विचार मंचावर अरविंद सावंत अध्यक्ष जागृत नागरीक सेवा संघ ओरोस सिंधुदुर्ग , संजय खोटलेकर जिल्हासहसचिव अभाअंनि समिती सिंधुदुर्ग , नामदेव मठकर सदस्य अभाअंनि समिती सिंधुदुर्ग तथा सेवानिवृत्त अधिक्षक जिल्हा व सत्र न्यायालय ओरोस आदी उपस्थित होते . यावेळी विजय चौकेकर यांनी शाळेतील मुलांना विविध हातचलाखीचे व रासायनिक संयुगाने तयार होणारी अनेक प्रात्यक्षिके मुलांना करून दाखविली . कोणामध्येही करणी करणे , भानामती करणे , मुठ मारणे , हातामधून वस्तू निर्माण करणे या साठी कोणतीही दैवी शक्ती नसते. अशी शक्ती प्राप्त होत असती तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये योग , याग , विधी येणे नव्हे सिद्धी । वायाची उपाधी दंभ धर्म । असे लिहून ठेवले नसते . वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया . आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना जादूटोणा करून फसविणाऱ्या भोंदू लोकांपासून सावध करूया आणि आपले जीवन समृद्ध करूया असे आवाहन केले .
यावेळी प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका रिया आळवेकर यांनी सुत्रसंचालन केले . कार्यक्रमचे प्रास्ताविक संजय खोटलेकर यांनी केले तर आभार संगिता सावंत मॅडम यांनी केले .
यावेळी इ . १ ली ते सातवीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला .
यावेळी प्रशालेचे शिक्षक लक्ष्मण राठोड सर , पदवीधर शिक्षिका स्मिता गवस मॅडम , नीता सावंत मॅडम , संगिता सावंत मॅडम , माधवी सावंत मॅडम , तेजस्विनी सावंत मॅडम , मनाली कुडाळकर मॅडम , ग्रामस्थ तसेच शालेय पोषण आहार बनविणारे कर्मचारी उपस्थित होते .