विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलागुणांनी केंद्र शाळा आचरा येथे शिवजयंती साजरी

आचरा–अर्जुन बापर्डेकर केंद्रशाळा नंबर १ येथे मुलांनी सादर केलेल्या कलांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमा पूजनाने झाली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर केंद्रप्रमुख सुगंधी गुरव मंगेश मेस्त्री .ग्रा प सदस्या किशोरी आचरेकर पालक विष्णू भाटकर, प्रथमेश गाडी संदीप पांगम, मुख्याध्यापक चंद्रकांत माने आधी उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अफजल खानाची भेट, पोवाडा, एकच राजा इथे जन्मला हे गाणे, झुलवा पाळणा, राजा आलं, जय शिवाजी जय भवानी आदी नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक संतोष आचरेकर अरुण आडे ,मीरा बांगर महेश चव्हाण सिद्धी मिस्त्री व पल्लवी पालकर यांनी विशेष मेहनत घेतली

error: Content is protected !!