भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंती निमित्ताने सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भाजपा नाटळ -सांगवे विभाग आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने कनेडी बाज़ारपेठ येथे सकाळी ठीक १०:०० वा
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकर्षक चित्ररथ,ढोल वादन व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय..
जय शिवाजी जय भवानी
अशा घोषणांनी सर्व परीसर दणाणून गेला.
संदेश ऊर्फ गोट्या सावंत, सौ संजना संदेश सावंत,निवृत्त शिक्षण अधिकारी मोहन सावंत, विजय भोगटे, सुरेश सावंत, सरपंच बाबू सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, सानिका गावकर,उपसरपंच संजय सावंत, प्रफुल्ल काणेकर, सागर सावंत, विनोद सावंत, राजश्री पवार, मयुरी मुंज, मिनल पवार,वैष्णवी सुतार, विठ्ठल रासम,संजय गावकर, शालेय विद्यार्थी आणि शिवप्रेमी बहूसंख्येने उपस्थिती होते.यावेळी उपस्थितांना जिलेबी आणि मिठाई चे वाटप करण्यात आले. तसेच संध्याकाळी बुवा विनोद चव्हाण × बुवा गुंडू सावंत यांच्या पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!