शिवसेना ठाकरे गट जानवली विभाग संघटक पदी शोभा मुरकर यांची निवड

महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांनी केली निवड जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने, कोल्हापूर -सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख तथा उपनेते अरुण दूधवडकर यांच्या सूचनेनुसार, व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या मार्गदर्शनाने जानवली विभाग संघटक पदी सौ. शोभा संजय मुरकर यांची महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव यांनी निवड केली. यावेळी कणकवली तालुका संघटक वैदेही गुढेकर, उप तालुका संघटक संजना कोलते, शहर प्रमुख साक्षी आमडोस्कर,उपशहर प्रमुख दिव्या साळगावकर, रसिका मुरकर आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!