जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन दि .२१ व २२ फेब्रुवारी २०२४ ला
किरण उर्फ भैया सामंत यांची विशेष उपस्थिती
शालेय स्कूल बसचे उद्घघाटन
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दी.२१ व २२ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्न – सिंधू योजनेचे संचालक व उद्योजक किरण उर्फ भैया शेठ सामंत हे उपस्थित राहणार आहेत.तर याचवेळी शाळेच्या स्कूल बसचे उद्घघाटन तथा लोकार्पण सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
खारेपाटण केंद्र शाळा ही राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल शाळा म्हणून गौरविण्यात आलेली शाळा असून लोकसहभागातून शाळांचा होणारा आदर्श विकास व निर्मिती याचे मुर्ती मंत उदाहरण म्हणजे खारेपाटण केंद्र शाळा होय.सलग दोन दिवस चालणाऱ्या या वार्षिक स्मेसमेलना करिता विवीध शेत्रतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.अशी महिती केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून दिली.
शालेय विद्यार्थी गुणगौरव व तथा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थी फूड फेस्टीवल कार्यक्रमाचे उद्घघाटन दी.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं.५.०० वाजता होणार आहे. यावेळी सायं. ५.३० वाजता शालेय विद्यार्थ्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या स्कूल बस चे उद्घघाटन तथा लोकार्पण सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.तसेच सायंकाळी पालक व शालेय विद्यार्थी यांकरिता ठेवण्यात आलेल्या रंगावली स्पर्धा दालणांचे उद्घघाटन करण्यात येणार आहे.सायं.७.०० वाजता शालेय विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ सायं.७.३० वाजता खारेपाटण येथील शिशूविहार व अंगणवाडी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.रात्री ८.३०वाजता शालेय गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा रात्री १०.०० वाजता खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडणार आहेत
तर दी.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा दुपारी १२ ते २.०० स्नेहभोजन सायं.५.०० पालक फूड फेस्टिवल शुभारंभ सायं.७.३० वा.स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ तर रात्री ठीक ८.०० खारेपाटण केंद्र शाळेच्या मुलांचे विवीध गुणदर्शन २ तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच खारेपाटण केंद्र शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे
फूड फेस्टिवल स्पर्धा – (शालेय गट) प्रथम क्रमांक ७०१ रुपये द्वितीय क्रंमाक – ५०१ रुपये तृतीय क्रमांक – ३०१ तर खुला गट – प्रथम क्रमांक – १००१ रुपये,द्वितीय क्रमांक – ७०१ रुपये,तृतीय क्रमांक – ५०१ रुपये
रंगावली स्पर्धा – (शालेय गट)
प्रथम क्रमांक – ५०१ रुपये,द्वितीय क्रमांक – ३०१ रुपये,तृतीय क्रमांक – २०१ रुपये खुला गट – प्रथम क्रमांक – ७०१ रुपये,द्वितीय क्रमांक – ५०१ रुपये,तृतीय क्रमांक – ३०१ रुपये
फॅन्सी ड्रेस स्पर्धा (शिशुविहार/अंगणवाडी गट) – प्रथम क्रमांक – ३०१ रुपये,द्वितीय क्रमांक – २०१ रुपये,तृतीय क्रमांक – १०१ रुपये १ली ते ४ थी गट – प्रथम क्रमांक – ५०१ रुपये,द्वितीय क्रमांक – ३०१ रुपये,तृतीय क्रमांक – २०१ रुपये
५वी ते ७ वी गट- प्रथम क्रमांक –
५०१ रुपये,द्वितीय क्रमांक – ३०१ रुपये,तृतीय क्रमांक – २०१ रुपये
खुला गट – प्रथम क्रमांक – ७०१ रुपये,द्वितीय क्रमांक – ५०१ रुपये तृतीय क्रमांक – ३०१
रेकॉर्ड डान्स स्पर्धा – (१ली ते ७ वी गट) प्रथम क्रमांक -७०१ रुपये, द्वितीय क्रमांक – ५०१ रुपये,तृतीय क्रमांक – ३०१ रुपये
खुला गट – प्रथम क्रमांक – १००१ रुपये,द्वितीय क्रमांक – ७०१ रुपये,तृतीय क्रमांक – ५०१ रुपये
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण