लैखक प्रदीप केळूसकर यांच्या माणिकमोती कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा कुडाळमध्ये उत्साहात

लेखक आपल्या जीवनानुभवातून संभाव्य कथाबीजाची निवड करत असतो – वृंदा कांबळी

कोकण मराठी साहित्य परीषद कुडाळ शाखेने लेखक प्रदीप केळुसकर यांच्या माणिकमोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून पी. एस. कौलापुरे सर उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, शाखाध्यक्ष वृंदा कांबळी, प्रमुख वक्ते प्रा. संतोष वालावलकर, लेखक प्रदीप केळुसकर व सचिव सुरेश पवार उपस्थित होते.
कथा व कादंबरीकार वृंदा कांबळी यानी कथानिर्मितीविषयी बोलताना केळुसकरानी त्यांच्या ग्रामकण व नागरी जिवनातील अनुभवविश्वातून कथाबीज निवडून घेतली असे सांगितले. कथाबीजाची निवड झाल्यानंतर जाणीवपूर्वक करावयाच्याही अनेक गोष्टी असतात. केळुसकरानी आपल्या कथा अशाच एकाग्रतेतून लिहिल्या आहेत. लघुकथेचे स्वरूप तिच्या लांबीरूंदीवरून ठरत नसते. तर लघुकथा ही एककेंद्री व ऐकजिनसी असते म्हणून तिला लघुकथा म्हणतात. केळुसकरानी निवडलेली कथाबीज फुलवली, रंगवली, विस्तारली असे त्यानी सांगितले.
प्रमुख वक्ते प्रा. संतोष वालावलकर यानी पुस्तकातील सतरा कथांचा थोडक्यात आढावा घेतला. कथांमध्ये प्रादेशिकतेप्रमाणे संवादाची भाषा बदलली आहे. त्यामुळे कथांमध्ये वातावरणनिर्मिती चांगली साधली आहे. कधी कधी काही कथा अचानक वळण घेतात. त्यामुळे पुढे काय याची उत्सुकता निर्माण होते. त्यानी कथा वाचनीय झाल्या आहेत. वाचकाच्या मनाची पकड घेणारा असा हा कथासंग्रह आहे असे प्रा. वालावलकरनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यानी आदरणीय पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यानी स्थापन केलेल्या कोमसापच्या जिल्हा शाखेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. पुस्तकाला व लेखकाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे पी. एस. कौलापुरे सर यानी बोलताना केळुसकरांच्या एकूणच कथांची वैशिष्ट्ये सांगितली. आपण त्यांच्या कथांचा वाचक असल्याचे सांगितले.
लेखक प्रदीप केळुसकर यानी आपल्या कथासंग्राच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले. विविध दिवाळी अंकातून सतरा कथा प्रसिद्ध झाल्या.त्यांचे संकलन या पुह्तकात केले आहे. सोशल मिडियावर आपल्या कथांना चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांचा प्रतिसाद पाहून पुस्तक काढण्याची प्रेरणा मिळाली. असे सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना आनंद वैद्य म्हणाले, कथा लेखकानी आपल्या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा. प्रतिक्रिया येवोत अगर न येवोत त्यांचा विचार न करता लिहित राहावे. उत्तमतेचा ध्यास घ्यावा. केवळ,लाईक्स मिळवण्यासाठी लेखन नसावे.
कार्यक्रमाला वाचक , रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणजित देसाई, सुनिल सौदागर , अजित याऊळ ………..तसेच डॉ उमाकांत सामंत, प्रवीण उर्फ भैय्या सामंत, रेवती प्रभू,वेगर्ल्याचे अजित राऊळ आणि खुप मोठया सख्येने वाचक उपस्थित होते…………..
………………………………………………………………. इत्यादी रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रस्ताविक व स्वागत सचिव सुरेश पवार यानी केले. मान्यवरांचा परिचय कोमसाप कुडाळ शाखेच्या उपाध्यक्षा स्नेहल फणसळकर यानी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तमरितीने अमर प्रभू यानी केले.

कुडाळ(प्रतिनिधी)

error: Content is protected !!