न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे शिवजयंती उत्सव आणि प्रशालेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आचरा–अर्जुन बापर्डेकर न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे मुलांचे पोवाडा गायन,मुलांनी सादर केलेल्या शि्वचरीत्र महिमाने
शिवजयंती उत्सव आणि न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला गेला.
स्कूल समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला समिती सदस्य बाबाजी भिसळे,तंत्र कौशल्य विकास केंद्र समितीचे रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य दळवी, इंग्लिश मेडीअमच्या मायलीन फर्नांडिस, उपमुख्याध्यापक घुटूकडे ,पारीपत्ये,मधुरा माणगावकर,रावले,सद्गुरु साटेलकर यांसह अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना बापर्डेकर यांनी शिवजयंती या पवित्र दिनी न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेचे लावलेल्या रोपट्याचा आत्ता विस्तार होत असून सध्याची कार्यरत समिती विविध शैक्षणिक उपक्रमातून मुलांना विविध शैक्षणिक सुविधा निर्माण करुन देत आहे. तंत्र विकास केंद्र सुरु करुन विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबी बनविण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन साटेलकर यांनी तर आभार रावले यांनी मानले.

error: Content is protected !!