छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

सिंधुदूर्गनगरी – ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाळ अर्पण करीत अभिवादन केले गेले. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीतचे गायन करण्यात आले. यावेळी सिंधुदूर्ग किल्ल्यातून प्रज्वलीत केलेली शिवज्योत ओरोस पर्यंत दौड करून आणण्यात आली होती. या उपक्रमाचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!