ग्रामपंचायत नागवे व युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने हळदीकुंकू समारंभ उत्साहात

महिलांनी सर्वच क्षेत्रात सक्रिय सहभागी होण्याची गरज
माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांचे प्रतिपादन
ग्रामपंचायत नागवे आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या संयुक्त विद्यमानाने नागवे शाळा नं 1 हॉल येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. त्यानिमित्त माजी जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत, माजी प . स.सदस्या राजश्री पवार, दिगवळे सौ. मीनल पवार कनेडी पधाधिकारी तसेच नागवे सरपंच सौ .सिद्धिका जाधव, माजी सरपंच संचिता दळवी, मुख्याध्यापिका सौ. मेस्त्री, ग्रा.पं.सदस्या सौ .सुलभा भोसले, सौ.तन्वी आरेकर, सौ.योगिता तायशेटे, कु.कश्मिरा गोठणकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्री सावंत, सौ.अश्विनी सतावसे उपस्थित होते. गावातील सर्व महिलांनी यावेळी सहभाग घेतला .उपस्थित सर्व महिलांचे सौ.पाटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कणकवली प्रतिनिधी