भालचंद्र महाराज जन्मदिनानिमित्त सचिन कुवळेकर यांचा देखावा ठरला लक्षवेधी

दरवर्षी केला जातो आकर्षक देखावा

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 120 व्या जन्मदिनानिमित्त गुरुवारी शहरातून काढलेल्या पालखी मिरवणुकीदरम्यान भालचंद्र महाराज यांचे भक्त सचिन कुवळेकर यांनी तेलीआळी येथील रोडलगत भालचंद्र महाराज यांचा आकर्षक देखावा तयार केला होता. हा देखावा लक्षवेधी ठरला.
भालचंद्र महाराज यांचे कुवळेकर हे भक्त आहे. महाराज यांच्या जन्मोत्सव व पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी भालचंद्र महाराज यांचा देखावा तयार करीत असतात. यंदाही महाराज यांच्या जन्मदिन व महाराजांच्या पालखी मिरवणुकीनिमित्त कुवळेकर यांनी आपल्या रिक्षेची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती. रिक्षेच्या मुख्यकाचेवर भालचंद्र महाराज यांचे थ्रिडी स्वरुपातील चित्र लावले होते. ही रिक्षात तेलीआळी रोडलगत उभी करून त्याच्या बाजूला प्रभू श्री रामांचा बॅनर देखील लावला होता. या बॅनरवरही विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे पालखी मिरवणुक सहभागी झालेल्या भक्ताचे लक्ष हा देखावा व प्रभू रामांचा बॅनर लक्ष वेधून घेत होता.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!