रिगल कॉलेज कणकवली येथे फूड फेस्टिवल उत्साहात साजरा

दि. २८ जानेवारी २०२४ रोजी रिगल कॉलेज जानवली येथे वार्षिक स्नेहसंमेलन व फूड फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
टी.वाय.बी.एस.सी (हॉटेल मॅनेजमेंट) च्या मुलांनी इव्हेंट मॅनेजमेंट या विषयांतर्गत थीम डिनर चे आयोजन केले होते. यावर्षी “विंटर वंडरलँड” ही थीम घेऊन त्या पद्धतीची सजावट करण्यात आली होती. त्यावर आधारित जेवण तसेच बुट्टा काउंटर इत्यादीची व्यवस्था करण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून “संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ” चे प्रा. श्री.डॉ. योगेश कोळी तसेच दैनिक पुढारी चे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख श्री.गणेश जेठे तसेच रिगल संस्थेंचे प्रमुख श्री संजयराव शिर्के सर, चिपळूण उद्योजक श्री इदाते सर ,जानवली गावचे सरपंच श्री. अजित पवार, मुंबई पोर्ट क्लास टू ऍक्टिंग ऑफिसर श्री अनिल कामतेकर सर, जानवली ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश राणे ,रिगल कॉलेज च्या प्राचार्या श्रीम. तृप्ती मोंडकर , हॉटेल मॅनेजमेंटच्या विभागप्रमुख श्रीम. मधुमती मोहिते उपस्थित होत्या.
रिगल कॉलेजच्या सर्व विध्यार्थ्यानी लॉटरी तिकीट, स्पॉन्सर, फूड तिकीट यामाध्यमातून कार्यक्रमासाठी फंड जमा केला. विध्यार्थ्यानी सजावट तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लॉटरी मध्ये साईश कदम याला स्मार्ट टीव्ही, द्वितीय क्रमांक केतकी तेली (बिडवाडी)हिला मोबाईल ,त्रितीय क्रमांक गौरी तळगावकर(खारेपाटण) टॉवरफॅन ,चतुर्थ क्रमांक संदीप परब (खारेपाटण) इअरपॉड्स , पाचवा क्रमांक मयुरेश बावकर याला इस्त्री इत्यादी बक्षिसे मिळाली .
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या श्रीम. तृप्ती मोंडकर यांनी केली. कॉलेजमधील विविध उपक्रमाची माहिती त्यांनी सदर प्रस्तावनेत दिली. प्राध्यापिका सौ. मधुरा सावंत यांनी या वर्षीच्या विंटर वंडरलँड थीम विषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री.डॉ.योगेश कोळी व श्री. गणेश जेठे यांनी उपस्थितांना मोलाचे मागदर्शन केले. रिगल कॉलेज चे अध्यक्ष श्री संजयराव शिर्के सर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रिया पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती. मधुमती मोहिते मॅडम यांनीं केले. कार्यक्रमाला विध्यार्थी ,पालक,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
प्रतिनिधी, कणकवली