सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ लावलेली मोटर सायकल गेली चोरीला

सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांचा वाढला सुळसुळाट

सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ काल दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सोनुर्ली येथील ग्रामस्थ नागेश ननी गावकर यांनी स्वतःच्या मालकीची लावलेले हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गाडी चोरीला गेली असून गाडी क्रमांक MH 07M 3613असा आहे. नागेश गावकरी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी सकाळी काल आले होते. तिकीट काढून झाल्यानंतर ते बाहेर एक तासानंतर येऊन पाहतात तर त्यांची गाडी त्यांनी बाहेर लावलेल्या ठिकाणीं आढळून आली नाही. त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात पूर्ण शोधा शोध केली तरी पण गाडी सापडली नाही. आज पोलीस स्थानकावर याची रिक्षा तक्रार करण्यात आली आहे संबंधित चोरट्यांना गजर करणे गरजेचे आहे मोटरसायकल चोरण्याचे प्रमाण सावंतवाडी तालुक्यात वाढत आहे. गेल्या वर्षी पण या हंगामात या सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात लावलेली मोटरसायकल चोरीला गेली होती. त्यामुळे या चोरट्याचा तात्काळ बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!