सावंतवाडी रेल्वे टर्मिनस विषय मानवता विकास परिषदेच्या अजेंड्यावर

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस झाल्याशिवाय कोकण रेल्वे ही खऱ्या अर्थाने कोकण रेल्वे ठरणे केवळ अशक्य आहे या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस साठी कोकणातील विविध पक्ष संघटना नागरी यांनी आंदोलन छेडले आहे या आंदोलनास मानवता विकास परिषदेचा ठाम पाठिंबा आणि सक्रिय सहभाग कायम राहील असे मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी म्हटले आहे
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आंदोलनात पूर्ण वेळ सहभागी राहिल्यानंतर विविध संघटना कार्यकर्त्यांशी श्रीकांत सावंत यांनी संवाद साधला कोकण रेल्वेत कोकण नाही अशी सध्या स्थिती आहे कोकणच्या लोकप्रतिनिधींनी कोकण रेल्वे साकारली कोकणच्या लोकांनी जमिनी दिल्या पण कोकणच्या माणसाला उपरे ठरल्या सारखा अनुभव येत आहे कोकण रेल्वे खऱ्या अर्थाने कोकण रेल्वे ठरायची तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस झाले पाहिजे अशी भूमिका श्रीकांत सावंत यांनी यावेळी मांडली
श्रीकांत सावंत यांनी मिहीर मटकर तेजस तळवडेकर सागर तळवडे कर भूषण बांधीवडे कर आदींसह अनेक तरुणांशी यावेळी संवाद साधला.
सावंतवाडी (प्रतिनिधी)





