भिरवंडे ग्रामंचायतीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्याला ध्वजारोहणचा मान

प्रजासत्ताकदिना निमित्त भिरवंडे ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायतचे सेवानिवृत्त कर्मचारी हरिश्चंद्र उर्फ बाळा मारुती सावंत यांना देण्यात आला. भिरवंडे हणुमंतवाडी नंबर 2 मधील ज्येष्ठ नागरिक असलेले बाळा सावंत हे ग्रामपंचायत मध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते.
भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये समाजातील वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांना ध्वजारोहणाचा मान दिला जातो.26 जानेवारी 2024 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत मधून 10 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या बाळा सावंत यांना देण्याचे सरपंच नितीन सावंत यांनी सुचविले त्याला उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.केंद्रप्रमुख श्री.सुर्यवंशी,तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश घाडीगांवकर ,सदस्य मिलिंद पवार, सौ.रश्मी सावंत. सौ. अंकिता सावंत.मुख्याध्यापिका प्रिया सावंत,सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत,अरविंद सावंत,आप्पा सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश सावंत,शिक्षक जगन्नाथ गावकर,सौ.चिंदरकर,सौ.बगळे, आरोग्य सेविका सौ.अक्षता सावंत,विशाल सावंत,ऋषिकेश सावंत, अशोक सावंत,अंगणवाडी सेविका सौ.सुरेखा सावंत,सौ.विनिता सावंत.सौ.मनीषा सावंत, शितल राणे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते व भिरवंडे गावचे माजी सरपंच स्वर्गीय शांतारामभाऊ सावंत यांच्या कार्यकाळा पासून बाळा सावंत हे ग्रामपंचायत मध्ये शिपाई म्हणून सेवेत होते.आपल्याला ध्वजारोहणाचा मान देण्यात आल्याने बाळा सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!