अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ रेडी यशवंत गड शिवप्रेमी, भोगवे ग्रामपंचायत व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तालुक्यातील किल्यावर ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधुन, प्रजासत्ताक दिनी किल्ल्यावर पुजन व ध्वजारोहण

शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेल्या पवित्र यशवंत गड किल्ल्यावर, तसेच वेंगुर्ले कोट व निवती किल्ला वर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वे शिवराज्याभिषेक वर्ष, २६ जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात हे वर्ष शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही (AMGM) हे वर्ष साजरे करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला होता.
या कार्यक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७ किल्यां पैकी वेंगुर्ले तालुक्यातील यशवंत गड, किल्ला निवती व वेंगुर्ले कोटची निवड करण्यात आली होती.
यशवंत गड शिवप्रेमी व अखिल भारतीय गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत गड येथे आयोजित शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व पप्पु तेंडूलकर यांनी केले. यावेळी यशवंत गड शिवप्रेमी कार्यकर्ते
उपस्थित होते. तर निवती किल्ल्यावर येथे ग्रामपंचायत भोगवे व अखिल भारतीय गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रतिनिधित्व भोगवे सरपंच रुपेश मुंड्ये यांनी केले यावेळी अवधूत रेगे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
तर वेंगुर्ले कोट येथे जनसेवा प्रतिष्ठान व अखिल भारतीय गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रतिनिधित्व डॉ. सई लिंगवत यांनी केलं यावेळी पुरातत्व विभागाचे संचालक विलास वाहने, डॉ. धनश्री हिरेमठ, सीमंतिनी मयेकर व पुरातत्व खात्याचे कर्मचारी, उपस्थित होते.
वेंगुर्ले तालुक्यातील तिन्ही किल्यांवर अतिशय उत्सवाच्या वातावरणात हे कार्यक्रम पार पडल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी कळविले आहे.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सौजन्याने, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे मुख्य सल्लागार श्री राजेंद्र रघुनाथ परूळेकर यांच्या शिस्तबद्ध नियोजनाने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
 
	




