शेर्पे स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
शेर्पे या गावातील मुख्य रस्ता ते स्मशान भूमिकडे जाणारा रस्ता (उर्वरित) खडीकरण व डांबरीकरण करणे ह्या कामाचा शुभारंभ दि.२४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम व वित्त माजी सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार व खारेपाटण विभाग भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी या भूमिपूजन प्रसंगी शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, उपसरपंच-सिराज मुजावर, संतोष ब्रह्मदांदे -कुरंगवणे सरपंच ,शाबान मुजावर -शेर्पे बूथ अध्यक्ष, निशा गुरव -माजी सरपंच, विनोद शेलार -पोलीस पाटील , सी.पी.कांबळे- तंटामुक्त समिती अध्यक्ष, भूषण शेलार,शीतल कांबळे,राजश्री बेलनेकर,सायली पांचाळ ग्राम पंचायत सदस्य, श्री.मोहन माने ग्रामसेवक, रामा पांचाळ -माजी उपसरपंच, सुभाष शेलार,मधुकर शेलार,सुरेश, ब्रह्मदडे,दत्ताराम सावंत,विजय कांबळे -माजी उपसरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -सत्यविजय शेलार आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण