हळवल फाट्यावर चार चाकी पलटी होत अपघात

तिघेजण जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर लावलेले रंबलर, सूचनाफलक या उपायोजना ठरतात कुचकामी
महामार्गावर गडनदी ब्रिज पुढील हळवल फाट्यावर आज पुन्हा एकदा चार चाकी कार पलटी होऊन यातील तिघेजण जखमी झाले. गोव्याच्या दिशेने जाणारी चार चाकी वरील अवघड वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी होत यातील प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हळवलं फाट्यावरील अपघात टाळण्यासाठी रंबलर, सूचना फलक आदींचा वापर करण्यात आला होता. तरी देखील पुन्हा एकदा हा अपघात घडल्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. गडनदी पुलापासून घातलेले रंबलर हे अपघात रोखण्यासाठी अकार्यक्षम ठरत असल्याने याबाबत आता पुन्हा एकदा प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज आहे.
कणकवली /प्रतिनिधी





