पोईप येथील श्री देव वेताळ मुंजेश्वर मंदिर येथे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा

विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ वायरी मालवण यांचा प्रथम क्रमांक
पोईप ग्रामस्थ व भजन प्रेमी यांच्यावतीने पोईप येथील श्री देव वेताळ मुंजेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
पोईप ग्रामस्थ व भजन प्रेमी यांच्यावतीने निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
या भजन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे तो बुवा श्री अक्षय परुळेकर श्री विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ वायरी मालवण या मंडळाला पोईपचे उद्योजक अभिषेक डिचवलकर यांच्या कडुन रोख रूपये 5555 तसेच सन्मानचिन्ह सरपंच श्रीधर नाईक यांच्या कडून, द्वितीय क्रमांक बुवा श्री संजय मालंडरकर भिवतादेवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस यां मंडळाला पोईपचे उद्योजक पंकज वर्दम यांच्या कडून रोख रूपये 3333 , तसेच सन्मानचिन्ह सरपंच श्रीधर नाईक,तर तृतीय क्रमांक पटकावला आहे तो बुवा श्री ऋषिकेश गावडे नृसिंह संगीत साधना भजन मंडळ गोळवण, या मंडळाला पोईपचे उद्योजक प्रभाकर नाईक यांच्या कडून रोख रूपये 2222 तर सन्मानचिन्ह सरपंच श्रीधर नाईक तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक बुवा श्री जय राऊळ रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, द्वितीय क्रमांक बुवा श्री मंदार मेस्त्री भालचंद्र प्रसादीक भजन मंडळ हळवल, तृतीय क्रमांक बुवा श्री विनायक भिडे रवळनाथ प्रफुल भजन मंडळ आडवली या तिन्ही भजन मंडळाना पोईप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल नाईक यांच्या कडून प्रत्येकी रोख रूपये 1111 ,उत्कृष्ट गजर भिवतादेवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस संजय मालंडकर यांना रोख रूपये 501 उदय माधव यांच्या कडून, उत्कृष्ट पखवाज वादक
भिवतादेवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस विश्वजीत मेस्त्री यांना रोख रूपये 1111पुरस्कृत श्री दत्तगुरु पोईपकर, यांच्या कडून ,उत्कृष्ट तबलावादक श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी अमन सातार्डेकर यांना रोख रूपये 501 गौरेश नाईक , यांच्या कडून,उत्कृष्ट झांज वादक भिवतादेवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस श्री पार्थ गवस यांना रोख रुपये 501 संतोष हिवाळेकर यांच्या कडून , उत्कृष्ट कोरस भिवतादेवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस यांना रोख रूपये ,1111 श्री विठोबा माधव, उत्कृष्ट गायन विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ वायरी मालवण बुवा अक्षय परुळेकर यांना रोख रूपये 1111 श्री शुभम भाटकर यांच्या कडून ,तसेच विजेत्या मंडळाला व उत्कृष्ट कोरस,गायन, तबलावादक, पखवाज,या सर्वांना सन्मान चिन्ह ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक यांच्यावतीने देण्यात आली तसेच सन्मानपञ किशोर पालव यांच्या कडून देण्यात आली
यावेळी या भजन स्पर्धेसाठी उपस्थित परिक्षक श्री माधव गावकर व महेश परब तसेच परशुराम नाईक, दत्ताराम पालव , गोपीनाथ पालव, सरपंच श्रीधर नाईक, माजी सरपंच शिवरामपंत पालव,नंदु माधव,बाळा सांडव, बाळा पोईपकर, अभिषेक डिचवलकर, पंकज वर्दम, शुभम भाटकर, अभिषेक पालव लक्ष्मन जाधव, सोमा जाधव, विलास सांडव, प्रभाकर नाईक, महेश पालव,राजा पालव,बिरबल पालव, गिरीश पालव, यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा साजरा झाला यावेळी ग्रामस्थ,व भजन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
संतोष हिवाळेकर पोईप