कणकवली- जानवली ला जोडणाऱ्या 8 कोटीच्या पुलाच्या कामाला मंजुरी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती
पुलाच्या कामासाठी काहींनी देखावा केला बंडू हर्णे यांचा टोला
राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामधून कणकवली शहराचा मागील 5 वर्षांत सर्वांगीण विकास केला. कणकवली शहराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार, केंद्रीयमंत्री राणे, पालकमंत्री चव्हाण, आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून जानवली नदीवर गणपती साना येथे ब्रिज मंजूर झाला असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 8 कोटी 8 लाखांच्या निधीची प्रशासकीय मंजुरी या ब्रिजसाठी मिळाली असल्याचेही समीर नलावडे यांनी सांगितले. तर या ब्रिजच्या कामासाठी निधी मिळवून देण्याकरता लोकप्रतिनिधी, शासन, अधिकारी यांचे आभार मानत असताना काहीनी या कामाकरिता देखावा देखील केला अशा टोला माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लगावला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. 80 मीटर लांब आणि 11.67 मिटर रुंदीचा, 6 मीटर उंचीचा हा ब्रिज असणार आहे. दुतर्फा वाहतूक असलेला हा ब्रिज वर्षभरात पूर्णत्वास जाणार आहे. जानवली आदर्शनगर ते कणकवली शहराला जोडणारा हा आणखी महत्वाचा ब्रिज असणार आहे. मागील कित्येक वर्षांची या ब्रिज ची मागणी आता पूर्णत्वास गेली असून यामुळे कणकवली शहराचा आणखी विकास होणार आहे. जानवली गणपती साना येथे बारमाही वाहणारा धबधबा या ब्रिज खाली येणार असल्यामुळे साहजिकच एक लक्षवेधी असे पर्यटन स्थळ नागरिकांना याठिकाणी पाहता येणार आहे. मागील 5 वर्षांत कणकवली शहरात नवीन डीपी रस्त्यांचे जाळे निर्माण केले, पोदार स्कुल उभे राहिले, विविध विकासाचे प्रकल्प उभे केले आहेत. जानवली नदीवरील गणपतीसाना येथिल हा ब्रिज कणकवली शहराच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे समीर नलावडे यांनी सांगितले. तर हे ब्रिज मंजूर होण्यासाठी अनेक अनेक प्रयत्न केले काहींनी देखावा केला. मात्र कणकवली शहराला एक दुसरे प्रवेशद्वार निर्माण झाले आहे. कणकवली सह अन्य ग्रामीणमधील भागामधील जनतेला या पुलाचा मोठा फायदा होणार आहे. कणकवली च्या वरील बाजारपेठेला उर्जितावस्था येणार असल्याचे यावेळी बंडू हर्णे यांनी सांगितले. कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी देखील हे काम करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्वपूर्ण काम बजावले आहे. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या स्टाफचे आभार मानत असल्याचे बंधू हर्णे यांनी सांगितले.
कणकवली/ प्रतिनिधी