टेंबवाडीत कन्नड रेणुका यल्लमा देवी दशावतार

कणकवली – टेंबवाडीतील भाग्यवंती देवीचा १९ सावा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. १८ जानेवारीला होत आहे. रात्री ९.३० वाजता कन्नड भाषेतील “रेणुका यल्लमा देवी” हे कर्नाटक दशावतारी नाट्य मंडळाचे पौराणिक नाटक सादर होणार आहे.

शुक्रवार दि. १९ जानेवारीला शहरात सकाळी १० वाजता देवीची वाजत गाजत मिरवणूक आणि गंगास्नान होणार आहे.

श्री भाग्यवंती देवी मंदिर ट्रस्टने गतवर्षी कणकवली शहरात स्थायिक झालेल्या विजापूर, बेळगाव आदी परिसरातील विविध प्रकारच्या व्यापार्यांनी देणग्या गोळा करून टेंबवाडीत पक्क्या स्वरूपाचे मंदिर बांधले आहे. कोकणात हे एकमेव मंदिर असल्याने कोकणात स्थायिक झालेले कन्नड भाषियासह स्थानिक भाविक या जत्रोत्सवाला हजेरी लावतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलावंतानांही कर्नाटक शैलीतील हा दशावतार अनुभवता येणार आहे.

error: Content is protected !!