युवा समाज कार्यकर्ते किरण अरोलकर यांचा बाबा आमटे स्मृती समाजसेवक पुरस्काराने गौरव

एकता कल्चरल अकादमी कडून गिरगावच्या साहित्य संघात पुरस्कार प्रदान

विरारः ….समाजातील निराधार, वंचित गरजूंच्या सेवेसाठी तनमनधनाने सतत धडपडणारे विरारमधील एक सदा चैतन्यशिल असणारे युवा समाज कार्यकर्ते म्हणजे किरण अरोलकर.

  किरण अरोलकर यांना नुकतेच एकता कल्चरल अकादमी या संस्थेने बाबा आमटे स्मृती समाजसेवक पुरस्कार ...प्रदान करून गौरविले. जेष्ठ गायीका पद्मजा फेणाणी आणि जेष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचे हस्ते किरण यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

प्राप्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना किरण अरोलकर यांनी नम्रपणे म्हटले की, “या पुरस्काराचे मानकरी अनेक व्यक्ती आहेत. सर्वात प्रथम माझी पत्नी जिने मला हे सगळं करण्यासाठी वेळ दिला. माझे आई – बाबा , भाऊ , बहीण, माझी कै . आजी तसेच मिञ – मैत्रिणी समस्त आरोलकर परिवार, मित्र परिवार विरार, मी जिथे काम करतो त्या San prints pvt Ltd या कंपनीचे माझे दोन्ही सर , तसेच सर्व स्टाफ , सामाजिक बांधिलकी संस्था आणि माझे सर्व सहकारी तसेच माझी हक्काची आपली माणसे, आई भवानी मित्र परिवार, व ज्यांनी – ज्यांनी आज पर्यंत समाज सेवा करण्यासाठी सढळ हस्ते मदत केली ते सर्वजण तसेच आयुष्यात कठीण समयी मागे उभे असणारे तमाम मित्र- मैत्रिणी या सर्वांच्या सहकार्याने आज मला हा समाजसेवा पुरस्कार मिळाला.असे म्हटले.

  पुढे बोलताना," दिवंगत बाबा आमटें सारख्या श्रेष्ठ व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार मिळाला.  त्यां बाबांच्या परिवाराला माझा त्रिवार सलाम! माझ्या आयुष्यात मला साथ देणारी माझी जीवा भावाची माणसं आणि कठीण प्रसंगी साथ देणारी हक्काची माणसं कायम माझ्यासोबत आहेत हे माझं भाग्य आहे. असे सांगून आपण एकटे काही करू शकत नसतो.साथ तुम्हा सर्वांची आहे. तेव्हा हा पुरस्कार आपल्या सर्वांचा आहे.आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहु द्या." अशा शब्दांत किरण अरोलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी किरण अरोलकर हे समर्थ आश्रमच्या कार्यात सतत उत्स्फुर्त पणेसहभागी होत असल्याचे सांगून बाबा आमटे स्मृती समाजसेवक पुरस्कार प्राप्तीसाठी अभिनंदन त्यांचे केले आहे.

किसन चौरे, कोकणनाऊ

error: Content is protected !!