कणकवली रेल्वे पुलाखालील तमिळ भाषिक निराधार बांधव पणदूरच्या संविता आश्रमात दाखल.

संविता आश्रमःपणदूर…कणकवलीच्या रेल्वे पुलाखाली एक ५८ ते ६० वयोगटातील एक निराधार व्यक्ती तेथून जाणारे वाटसरू अभिजित तांबे आणि प्रमोद महाडगुत यांना दिसून आली.त्यांनी याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना फोनद्वारे कळविले.
संदिप परब यांनी याची तात्काळ दखल घेवून संविता आश्रमातील सहकारी आश्रमचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत व केअर टेकर विजय नाईक यांना कणकवली येथे पाठविले.त्यांनी कणकवली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निराधार बांधवास संविता आश्रमात दाखल केले.
कणकवली पुलाखाली आढळून आलेले हे बांधव फारसे बोलत नाही. मात्र त्यांच्या थोड्याशा बोलण्यावरून ते तमिळभाषिक असल्याचे समजते.
संविता आश्रमातील स्टाफ कार्यकर्ते बांधवाची काळजी घेत आहेत.
किसन चौरे,कोकण नाऊ





