सांगवे येथे रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे निकृष्ट काम बंद पाडले

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी केली कारवाईची मागणी
ग्रीट चा वापर करून डांबर न वापरता भरले जात होते खड्डे
सांगवे काळीथर येथे रस्त्याचे खड्डे बुजवण्याचा काम चालू असताना डांबराचा वापर न करता केवळ ग्रीट द्वारे खड्डे बुजवण्याचे निकृष्ट काम सुरू असल्याची बाब निदर्शनास येतात युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी या निकृष्ट कामाला आक्षेप घेत हे काम बंद पडले. या बाबत बांधकाम कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड आणि शाखा अभियंता राहुल पवार यांना माहिती दिली असून निकृष्ट काम करणाऱ्या वर कारवाईची मागणी लोके यांनी केली आहे.





