लोरे नंबर 1 मधील शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण हटवा

ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्यासह शिष्ट मंडळाची मागणी
लोरे नंबर 1 मधील जि. प. मालकीच्या रस्त्यावर सरपंच अजय रावराणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अतिक्रमण केले आहे. हे शासकीय जागेत केलेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे. अतिक्रमण करणाऱ्या सरपंच अजय रावराणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसे न झाल्यास याप्रश्नी आंदोलन छेडू असा इशारा, शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना दिला. या बाबत चौकशीअंती दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले. यावेळी सतीश सावंत यांनी
अजय रावराणे यांनी पदाचा गैरवापर करून गावात अनेक बेकायदा कामे केली असा आरोप केला. यासंदर्भात सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेतली. या सर्वकामांची चौकशी करण्यात चावी, अशी मागणी केली यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, नीलेश राणे, अमित रावराणे, चंद्रशेखर रावराणे, सिद्धेश राणे, सी. आर चव्हाण आदी उपस्थित होते. अतिक्रमण प्रकरणी कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आहे का? असा सवाल अमित रावराणे यांनी केला. गावात स्मशानभूमी बांधण्यासाठी शासकीय जमिनीचा सातबारा दाखवून त्या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर केला. प्रत्यक्षात ही स्मशानभूमी एका व्यक्तीच्या खाजगी जमिनीत आहे, ही बाब अमित रावराणे अशी तक्रार त्यांनी केली. त्याचप्रमाणे ग्रामसभेच्या अजेंड्यावर विषय नसतानाही लोरे गावात एका मायनिंग कंपनीला नाहरकत दाखला सरपंचांनी दिला असल्याचा आरोप नीलेश राणे, अमित रावराणे, चंद्रशेखर रावराणे, विशाल रावराणे यांनी केला. याशिवाय गावात सरपंचांनी विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार केला आहे. त्या कामांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या बाबत चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.





