पत्रकार रवी गावडे यांना मातृशोक

कुडाळ : दैनिक रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी नारायण गावडे यांचे काल रात्रौ. २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कसाल येथील राहत्या घरी निधन झाले. यावेळी त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

error: Content is protected !!