तरंदळे येथील श्री टेवणादेवी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 12 डिसेंबर रोजी

तरंदळे येथील श्री टेवणादेवी जागृत देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव दि. 12 डिसेंबर 2023 रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक, पाषाण शुद्धीकरण व विविध धार्मिक कार्यक्रम होणार. रात्री ठिक 10 वा. सुधीर कलिंगण यांचे दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. त्यानंतर पहाटे 4 वाजता देवीचे ताटाची प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर माहेरवासीयांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जयसिंग नाईक व देवस्थान समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!