पिंपरी-चिंचवडमधील तळवडे फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी – अजित पवार

चिंचवड येथील आग दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश;भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश

नागपूर – पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी – चिंचवडमधील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!