कुडाळ च्या आजी माजी नगराध्यक्षांचा सत्कार

माऊली मित्रमंडळ ( कणकवली ), नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ ( कणकवली ) आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळाच्यावतीने कुडाळ शहराच्या नगराध्यक्षा आणि माजी बालकल्याण सभापती सौ. अक्षता अनंत खटावकर आणि महिला बालकल्याण सभापती कुडाळ नगरपंचायत, आफरिन अब्बास करोल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यांचा सत्कार कुडाळ शहरातील तबरेज शेख यांच्या हस्ते करण्यात आला.

या दोन्ही मान्यवरांचा सत्कार कुडाळ येथील त्यांच्यानिवास स्थानी जाऊन करण्यात आला यावेळी अविनाश गावडे,रविकांत जाधव, हसनैन शेख राजेंद्र पेडणेकर आदी उपस्थित होते.

कुडाळ (प्रतिनिधी)

error: Content is protected !!