नाशिक मध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान

काँग्रेसने केली नुकसान भरपाईची मागणी

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे

कोरड्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नव्हती. स्वतःच्या हिमतीवर स्वतःला सावरून पुन्हा उभं होत असताना काल अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे पुन्हा कंबरडे मोडले आहे.

नाशिक मधील द्राक्ष बागायतदार, कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. तर विदर्भ , मराठवाडा येथे तूर, कापूस, ज्वारी वारा आणि पाऊस यामुळे भूईसपाट झाली आहे तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्या मध्ये आंब्यांच्या मोहराचे नुकसान झाले आहे.

लागोपाठ सुरू असलेल्या दुष्काळी चक्रामुळे शेतकऱ्याला तातडीने सरकारी मदतीशिवाय आता कोणता पर्याय नाही. त्यामुळे सरकारने गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मा.आमदार श्री.विजय वडेट्टीवार यांनी ट्विट व्दारे राज्य सरकारला केली आहे.

नाशिक प्रतिनिधी

error: Content is protected !!