डीएड बेरोजगारांच्या प्रश्नी शिक्षण मंत्री नारायण राणेंच्या भेटीला

कणकवली ओम गणेश निवासस्थानी केसरकर – राणेंमध्ये बैठक सुरू
डीएड बेरोजगारांच्या प्रश्नी काय तोडगा निघणार याकडे राज्याचे लक्ष
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड बेरोजगारांचा ्प्रश्न सोडवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत तातडीचे बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर दाखल झाले आहेत. तर अनेक डीएड बेरोजगार तरुण, तरुणी ना. राणेंच्या बंगल्यावर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात महत्वपूर्ण बैठक सुरु आहे.काही वेळातच या डीएड बेरोजगार तरुण, तरुणी च्या मागणी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
कणकवली प्रतिनिधी





